मध्य रेल्वेच्या पाचव्या- सहाव्या मार्गिकेसाठी जमीन संपादन होणार

मध्य रेल्वे मार्गावर धारावी, माटुंगा आणि कुर्ला येथे चार मोठ्या पार्सल जमिनीची आवश्यकता आहे
मध्य रेल्वेच्या पाचव्या- सहाव्या मार्गिकेसाठी जमीन संपादन होणार

कुर्ला आणि परळ दरम्यानच्या पाचव्या- सहाव्या मार्गिकेसाठीच्या कामासाठी या वर्षी डिसेंबरपर्यंत जमीन संपादन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. भूसंपादन पूर्ण केल्यानंतर रेल्वे रूळ टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक लाहोटी यांनी दिली.

मध्य रेल्वे मार्गावर धारावी, माटुंगा आणि कुर्ला येथे चार मोठ्या पार्सल जमिनीची आवश्यकता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मध्य रेल्वेला नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनकडून पाचव्या- सहाव्या मार्गिकेसाठी जमीन मिळाली असून यासाठी सुमारे १२१ कोटी रुपये दिले गेले. उर्वरित ठिकाणी या वर्षअखेरीस जागा मिळणार असल्याचा दावा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राज्य सरकार आणि भारतीय रेल्वेमधील विविध एजन्सींमधील नोकरशहांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती सीएसएमटीपर्यंत पाचवी - सहावी मार्गिका आणण्यासाठी तपशील तयार करत आहे.

याचाच एक भाग म्हणून हार्बर मार्ग पी डी'मेलो रोडवर हलविला जाईल जो तेथे येणार्‍या मेट्रो रेल्वेशी देखील जोडला जाईल. यासाठी प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आणि भूसंपादनही करावे लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in