जेजे रुग्णालयात सर्वात मोठा सर्जिकल अतिदक्षता विभाग

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन
जेजे रुग्णालयात सर्वात मोठा सर्जिकल अतिदक्षता विभाग

मुंबई : मुंबईतील जेजे रुग्णालयात अत्याधुनिक अशा तीन शस्त्रक्रिया विभागाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे जास्त शस्त्रक्रिया होणार असून संसर्गविरहित शस्त्रक्रियागृहामुळे रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर लवकर डिस्चार्ज देणे शक्य होणार आहे. सर जेजे रुग्णालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील सर्वात मोठ्या सर्जिकल अतिदक्षता विभागाचे आणि नूतणीकरण केलेल्या मॉड्युलर शस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटनला आमदार यामिनी जाधव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

'असा' आहे विभाग

-ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेले सर्जिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट हे ३४ अद्ययावत खाटांनी सुसज्ज आहे.

- त्यामध्ये वेगळा आयसोलेशन कक्ष, बायोमेडिकल वेस्ट कक्ष तथा निगेटिव्ह प्रेशर रूमचीही सोय असणार आहे.

- नूतणीकरण करण्यात आलेली मॉडयुलर ऑपरेशन थिएटर (ओटी) ही सर्व अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असून, ऑटोमॅटिक पद्धतीने वापरण्याजोगी असेल.

- या ओटीमधून वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना क्लासरूममध्ये बसून शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण बघता येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in