जुन्या डबलडेकर बसेसची आज अखेरची फेरी; बेस्ट प्रशासनाला ना घेणं-ना देणं

दुमजली बस बरोबर अनेक मुंबईकरांची भावनिक नाळ जोडली गेली आहे
जुन्या डबलडेकर बसेसची आज अखेरची फेरी; बेस्ट प्रशासनाला ना घेणं-ना देणं

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर गेल्या ८६ वर्षांपासून दिमाखात वावरणारी तसेच प्रत्येक मुंबईकरांच्या आठवणींचा एक भाग असलेली बेस्टची दुमजली बस म्हणजेच डबल डेकर बसची शुक्रवारी मुंबईतील शेवटची फेरी असणार आहे. शनिवारी ही बस सेवानिवृत्त होत आहे. मुंबईच्या इतिहासातील हे मानाचे पान उद्या काळाच्या आड जाणार आहे. दुमजली बस बरोबर अनेक मुंबईकरांची भावनिक नाळ जोडली गेली आहे.

शुक्रवारी शेवटच्या या दुमजली बसला निरोप देण्यासाठी समस्त बस प्रवासी व बस प्रेमी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी आगरकर चौक अंधेरी येथे उपस्थित राहणार आहेत . या बसची शेवटची फेरी ४१५ या बस मार्गावर आगरकर चौक अंधेरी पूर्व ते सिप्झ दरम्यान धावणार आहे. या बसला निरोप देण्यासाठी आपली बेस्ट आपल्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला असून, अंधेरी पूर्व येथे या बसला भावनिकदृष्ट्या निरोप देणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त बसप्रेमी मुंबईकरांनी येथे हजर रहावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

कोणताही कार्यक्रम नको; सजावट करण्यास मज्जाव!

या कार्यक्रमासाठी बेस्ट उपक्रमातर्फे ने कोणतीही संमती दिली नसून, साधी बसची हार तुऱ्यांनी सजावट करण्यासाठी बेस्टने मज्जाव केला आहे. तसेच निरोप समारंभाचा कार्यक्रम करण्याची परवानगी आज शेवटपर्यंत देण्यात आली नाही. या बसचा कोणताही कार्यक्रम करण्यात येऊ नये, असे वरून आदेश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in