
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘प्रदूषणमुक्त मुंबई’ या मोहिमेचा शुभारंभ बुधवारी शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते पिंपळेश्वर मंदिर, मोहन बिल्डिंग, गिरगाव येथे करण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणे, झाडावर लावलेले पत्रे, खिळे, लोखंडी पट्ट्या, बॅनर, होर्डिंग, विद्युत रोषणाई काढून टाकणे व पदपथ बनवताना झाडाच्या मुळाभोवती लागेलेले सिमेंट काँक्रीट व डांबर काढून तिकडे लाल माती टाकून वृक्ष संवर्धन करण्याला सुरुवात झाली आहे. वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी केले. या कार्यकमाला माजी नगरसेविका मीनल जुवाटकर, शाखाप्रमुख बाळा आहिरेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.