'एक्सप्लोरेशन' एकल प्रदर्शनाला सुरुवात

नरिमन पॉईंट येथे कमलनयन बजाज कलादालनात १० डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन पार पडणार आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य पाहता येणार
'एक्सप्लोरेशन' एकल प्रदर्शनाला सुरुवात

ओडिशामधील सुप्रसिद्ध चित्रकार डॉ. अब्दुल सलाम खान ह्यांच्या नवनिर्मित चित्रांचे "एक्सप्लोरेशन" हे एकल प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नरिमन पॉईंट येथे कमलनयन बजाज कलादालनात १० डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन पार पडणार आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकाराने ॲक्रिलिक रंग व मिक्स मीडियमचा कलात्मक वापर करून काढलेली विलोभनीय चित्र निसर्गवैभव आणि त्याची वेगवेगळ्या ऋतूत आढळणारी रूपे तसेच छाया प्रकाशाच्या व सावल्यांचा माध्यमातून त्यात साकारलेला अनोखा दृष्यपरिणाम फार परिणामकारक रीतीने दर्शवितात.

डॉ. अब्दुल सलाम खान यांनी १५ एकल व सुमारे १५० सामूहिक कलाप्रदर्शनातून आजवर आपली चित्रे सर्व कलाप्रेमी आणि रसिकांपुढे मांडली आहेत. तसेच अंदाजे १८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्ट कॅम्पमध्ये भाग घेऊन त्यांनी आपली कला तेथे सादर केली आहे. प्रस्तुत चित्रप्रदर्शनात त्यांनी निसर्ग वैभव आणि त्याची विविध ऋतूतील आढळणारी विलोभनीय रूपे व त्यांचे कलात्मक पैलू आपल्या चित्र माध्यमातून सादर केले आहेत. आभासी आणि प्रत्यक्ष यांच्या कलात्मक समन्वयातून त्यांनी रंगपरिणामातून साकारलेली विविधांगी चित्रे फार मनोहर व रम्य तसेच आकर्षक आहेत. छाया प्रकाश, सावल्या यांचा सुंदर वापर करण्यात आला आहे. त्यांनी काढलेली विविधलक्षी चित्रे प्रत्येक संवेदनशील मानवी मनाला आवडतात व त्याला मनःशांतीसह समाधान देतात. तसेच प्रदर्शनात चित्रकाराची कलात्मकता, कल्पकता, माध्यमांवरील व तंत्रशुद्ध शैलीवरील प्रभुत्व आणि सौंदर्यदृष्टि ह्यांचे सर्वांना प्रकर्षाने दर्शन होते. तसेच प्रत्येक चित्रात प्रकाशाच्या कलात्मक वापरातून निराकार व आकार अशा दोन्ही अनुभूतीचे निसर्ग वैभव सर्वांना अनुभवता येते. त्यातील बोलकेपणा व स्पष्टता तसेच कलात्मकता खरोखर कौतुकास्पद व अतुलनीय अशी आहे. त्यांनी प्रत्येक चित्रांतून एक सामाजिक संदेश व जागृतीपर संवेदना दर्शविणारे भान ह्यांचा प्रतिकात्मक आविष्कार आपल्या चित्रसंपदेतून सर्वांना दिला आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in