औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराला विधिमंडळाची मंजुरी

प्रस्ताव गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आला.
औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराला विधिमंडळाची मंजुरी

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याबाबतचा प्रस्ताव आता अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आला. याबरोबरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासंदर्भातील प्रस्तावही केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हा प्रस्‍ताव मांडला.

महाविकास आघाडी सरकारने आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णयास मान्यता दिली होती. ठाकरे सरकार अल्पमतात असताना हा निर्णय घेण्यात आल्याने नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मार्गी लावला होता. त्याचबरोबर शिंदे सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्तावालाही हिरवा कंदील दर्शविला होता.

शिंदे यांनी विधानसभेत हा प्रस्ताव मांडला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचा निर्णय जाहीर करतानाच शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद येथील विमातळाच्या नावात बदल करण्याची सूचना केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in