कुष्ठ व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम राज्यात सुरु

या शोधमोहीमअंतर्गत राज्यातील पावणेदोन कोटी घरांना भेटी देण्यात येणार आहेत.
कुष्ठ व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम राज्यात सुरु

कुष्ठ व क्षयरोग राज्यातून हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवत वेळीच निदान झाल्यास वेळीच उपचार करणे शक्य होईल. त्यासाठी कुष्ठ व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम राज्यात मंगळवारपासून सुरू केली आहे. दरम्यान, संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिल्या. या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सोमवारी बैठक घेतली. त्यामध्ये जास्तीत जास्त कुष्ठ आणि क्षयरुग्ण शोधून उपचारांवर आणण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. या शोधमोहीमअंतर्गत राज्यातील पावणेदोन कोटी घरांना भेटी देण्यात येणार आहेत.

आरोग्य भवन येथे झालेल्या बैठकीस आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. आर. एस. आडकेकर, उपसंचालक डॉ. कैलास बावीस्कर, अलर्ट इंडिया संस्थेचे डॉ. व्हिन्सेंट ॲथोनी, बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्टचे डॉ. विवेक पै, महाराष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. रचना विश्वजीत, कुष्ठपीडित संघटना सचिव अशोक आंबेकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in