एलआयसी हाउसिंग फायनान्सचे गृहकर्जात झाली वाढ

एलआयसी हाउसिंग फायनान्सकडून कर्ज घेणाऱ्यांना आता ७.५० टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे
एलआयसी हाउसिंग फायनान्सचे गृहकर्जात झाली वाढ

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने गृहकर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे या कंपनीकडून गृहकर्ज घेतलेल्यांना अधिक ईएमआय भरावे लागेल. एलआयसी हाऊसिंग फायनान्सने गृहकर्जाच्या व्याजदरात ६० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.

या निर्णयानंतर आता एलआयसी हाउसिंग फायनान्सकडून कर्ज घेणाऱ्यांना आता ७.५० टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सने प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. एलआयसीने २० जूनपासूनच व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. एलएचपीएलआर हा प्रत्यक्षात मानक व्याज दर आहे ज्याशी एलआयसी एचएफएल कर्जाचा व्याजदर जोडलेला आहे. वाय विश्वनाथ गौर, एमडी आणि सीईओ, एलआयसी एचएफएल म्हणाले, “व्याजदरातील वाढ प्रचलित बाजार परिस्थितीनुसार आहे. ऐतिहासिकदृष्ट्या तुलना केल्यास दर अजूनही अतिशय स्पर्धात्मक पातळीवर आहेत. त्यामुळे गृहकर्जाची मागणी स्थिर राहण्याची अपेक्षा आहे."

एलआयसी हाऊसिंग फायनान्सने गेल्या महिन्यातही गृहकर्जाचे व्याजदर वाढवले होते. मात्र, क्रेडिट स्कोअरनुसार व्याजदरात वाढ करण्यात आलेली ही वाढ शेवटची होती. ७०० पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी गृहकर्जाच्या व्याजदरात २० बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर नवीन दर ६.९ टक्के करण्यात आला. त्याच वेळी, कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी २५ बेसिस पॉइंट्स वाढवण्यात आले. हे दर १३ मेपासून लागू झाले होत

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in