एलआयसी शेअर हजार पार, बाजारमूल्य ६ लाख कोटींच्या पुढे

आयुर्विमा उद्योग क्षेत्रात देशातील सर्वात मोठी सरकारी कंपनी असलेल्या एलआयसीच्या शेअर्समध्ये आता जोरदार वाढ होत आहे.
एलआयसी शेअर हजार पार, बाजारमूल्य ६ लाख कोटींच्या पुढे

मुंबई : आयुर्विमा उद्योग क्षेत्रात देशातील सर्वात मोठी सरकारी कंपनी असलेल्या एलआयसीच्या शेअर्समध्ये आता जोरदार वाढ होत आहे. पहिल्यांदाच एलआयसीच्या शेअर्सने एक हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे आणि एलआयसीचे मार्केट कॅप ६ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

मुंबई शेअर बाजारात सध्या एलआयसीच्या शेअरची किंमत ६.५८ टक्के वाढीसह १००६.८५ रुपये आहे. तसेच एलआयसीचे एकूण बाजारमूल्य ६, ३६, ८३२. ३९ कोटी रुपये आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी, मे २०२२ मध्ये, शेअर्स ९४९ रुपये किमतीला जारी करण्यात आले होते. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअर ४५ रुपयांच्या सवलतीत मिळाला, तर पॉलिसीधारकांना तो ६० रुपयांच्या सवलतीत मिळाला. एलआयसी ही देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी आहे. शेअर्सच्या वाढीमुळे एलआयसी जानेवारीमध्येच मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी बनली होती. आत्तापर्यंत, एसबीआयचे बाजार मूल्य ५.७९ लाख कोटी रुपये आहे आणि एलआयसीचे बाजारमूल्य ६.३७ लाख कोटी रुपये आहे. एसबीआयच्या शेअर्समध्ये सोमवारी घसरण होत होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in