भाडे नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचालकांचे परवाने रद्द

प्रवाशांशी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे अशा ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
भाडे नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचालकांचे परवाने रद्द

मुंबई : प्रवाशांशी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे अशा ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात आतापर्यंत १६५० तक्रारी प्राप्त झाल्या असून, ६५४ परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

प्रवाशांशी गैरवर्तन, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणाऱ्या ऑटोरिक्षा, टॅक्सीचालकांच्या व्हॉट्सॲप व ई-मेल आयडीवर ११ जुलै २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत १६५० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तर संबंधित कार्यालयाशी निगडित ७१७ तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६०४ तक्रारी या ऑटोरिक्षा व ११३ तक्रारी या टॅक्सी सेवेसंबंधित होत्या. तक्रारींमध्ये ५४० तक्रारी ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणे, ५२ तक्रारी या मीटरप्रमाणे देय असलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडे आकारणे व १२५ तक्रारी प्रवाश्यांशी गैरवर्तन करण्याबाबत प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे ७१७ परवानाधारकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. दोषी आढळलेल्या एकूण ६५४ परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यापैकी ५०३ परवानाधारकांचे ठोस कारणांशिवाय भाडे नाकारणे या कारणासाठी परवाने १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत ५८ वाहनधारकांकडून १ लाख ४५ हजार ५०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहेत. तसेच १०५ परवानाधारकांचे प्रवाशांशी गैरवर्तन करणे, ४६ परवानाधारकांचे मीटरप्रमाणे देय असलेल्या पेक्षा जादा भाडे आकारणे या कारणासाठी परवाना १० दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांमध्ये एकूण ८२ प्रकरणात २ लाख ४ हजार रुपये तडजोड शुल्क वसूल केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in