लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केली नवी योजना लॅंाच

ग्राहकांच्या निवडीनुसार सिंगल प्रिमियम लेव्हल इन्कम लाभ आणि सिंगल प्रिमियम वाढीव संरक्षणाबरोबर लेव्हल इन्कम लाभ मिळणार
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केली नवी योजना लॅंाच

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने धनसंचय ही नवी योजना सादर केली असून १४ जून २०२२पासून लागू करण्यात आली आहे. ही योजना नॉन लिंक्ड, व्यक्तिगत, बचत जीवन विमा योजना आहे. त्यात संरक्षण आणि बचत मिळते. तसेच पैसे भरल्याच्या कालावधीपासून मॅच्युरिटीपर्यंत उत्पन्न हमीचा लाभ आणि जीआयबीच्या अखेरच्या हफ्ताबरोबर गॅरंटेड टर्मिनल लाभ दिला जातो. ही योजना किमान ५ ते जास्तीत जास्त १५ वर्षांसाठी उपलब्ध आहे. या योजनेत ‘लेव्हल’पर्यंत उत्पन्नाचा लाभ, वाढणाऱ्या उत्पन्नाचा लाभ, ग्राहकांच्या निवडीनुसार सिंगल प्रिमियम लेव्हल इन्कम लाभ आणि सिंगल प्रिमियम वाढीव संरक्षणाबरोबर लेव्हल इन्कम लाभ मिळणार आहे.

मॅच्युरिटीचे लाभ हे गॅरेंटेड इन्कम बेनिफीट आणि गॅरंटेड टर्मिनल बेनिफीटमध्ये देण्यात येतील. जीवन विमा कालावधीत विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाते. मृत्यूनंतरचे लाभ विमाधारकाने निवडलेल्या पर्यायाप्रमाणे एकदम किंवा पाच वर्षांच्या कालावधीत हफ्यामध्ये दिले जातात. पैशाची चणचण असेल तर कर्ज सुविधेचा योजनेत समावेश आहे. अतिरिक्त प्रिमियम भरुन ‘ऑप्शनल रायडर्स’चा पर्याय उपलब्ध आहे. मृत्यूनंतरचे लाभ मिळवण्यासाठी तडजोडीचा पर्याय उपलब्ध असून त्यानुसार हे लाभ एकत्र घेण्यापेक्षा पाच वर्षांत हफ्यातमध्ये घेता येणार आहे.

या योजनेत पर्याय ए आणि बी मध्ये मिनिमम सम ॲश्युर्ड ३,३०,००० रु. आणि पर्याय सी मध्ये २,५०,००० रु., पर्याय डी मध्ये २२,००,०००. तर जास्तीत जास्त प्रिमियमसाठी कोणतीही मर्यादा नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय तीन वर्षे पूर्ण आणि पॉलिसीची मुदत किती निवडता त्यावर अवलंबून आहे. हा प्लॅन एजंट किंवा पॉईंट ऑफ सेल्स लाईफ इन्शुरन्स (पीओएसपी-एलआय) किंवा कॉमन पब्लिक सेंटर्स (सीपीएससी-एसपीव्ही) यांच्या मध्यस्थांमार्फत किंवा थेट वेबसाईट www.licindia.in वरुन खरेदी करु शकता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in