मलबार हिल येथील इको पाथवे प्रकल्पावरील स्थगिती उठवा इको पाथवे मॉर्निंग वॉक साठी उपलब्ध करा

आदित्य ठाकरेंचे पर्यटनमंत्र्यांना पत्र
मलबार हिल येथील इको पाथवे प्रकल्पावरील स्थगिती उठवा इको पाथवे मॉर्निंग वॉक साठी उपलब्ध करा

मुंबई : मलबार हिल परिसरात सुरु केलेल्या सिरी रोड पादचारी इको पाथवे या प्रकल्पावर स्थगिती दिलेली आहे. ही स्थगिती उठवत मलबार हिल परिसरातील नागरिकांना इको पाथवे मॉर्निंग वॉक साठी उपलब्ध करून द्या, असे पत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.

२०२१ मध्ये मलबार हिल येथील सिरी रोड पादचारी इको पाथवे हे ठिकाण अत्यंत चांगला पर्यावरण पूरक असा हा प्रकल्प मलबार हिल परिसरातील मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांसाठी विकसित करण्याचा निर्णय घेतला होता, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे. हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून पर्यावरण पूरक व नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अशा या परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेला सिरी रोड इकोपाथवे डेव्हलपमेंट प्रकल्प आपण स्थगिती देऊन येतील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा निर्णय घेतलेला आहे. या प्रकल्पाला स्थगिती देऊन सदर जागा राज्य सरकार आपल्या जवळच्या एखाद्या बिल्डरला देणार आहे, का अशी चर्चा येथील नागरिकांमध्ये चालू आहे. तरी या पर्यावरण पूरक प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करून येथील नागरिकांना एक अत्यंत उत्कृष्ट असा इको फ्रेंडली इको पाथवे मॉर्निंग वॉक साठी उपलब्ध करून देण्यात यावा. सदर प्रकल्पा वरील स्थगिती हटवून हा प्रकल्प पर्यावरणाची काळजी घेऊन इतर ज्या नैसर्गिक वनस्पती आहेत, त्यांचे जतन करून नैसर्गिकरीत्या हा पाथवे आहे. त्याच पद्धतीने विकसित करणे आवश्यक आहे, असे पत्रात नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in