उन्हाळी सुट्टीआधी राणी बागेत सिंह गर्जना; बालसवंगड्यांना प्राणीदर्शनाची भेट, महसूल वाढीवर BMC प्रशासनाचा उपाय

गेल्या वर्षभरात बालगोपाळ आणि पर्यटकांनी राणीच्या बागेकडे काहीशी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. यामुळे राणीच्या बागेतील पर्यटकांकडून होणाऱ्या महसुलात घट झाली आहे.
उन्हाळी सुट्टीआधी राणी बागेत सिंह गर्जना; बालसवंगड्यांना प्राणीदर्शनाची भेट, महसूल वाढीवर BMC प्रशासनाचा उपाय
Published on

मुंबई : गेल्या वर्षभरात बालगोपाळ आणि पर्यटकांनी राणीच्या बागेकडे काहीशी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. यामुळे राणीच्या बागेतील पर्यटकांकडून होणाऱ्या महसुलात घट झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि राणी बागेचा महसूल वाढवण्यासाठी मार्चपर्यंत राणी बागेत सिंह आणणार असल्याची माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

भायखळा येथील लहानग्यांची राणीबाग म्हणजेच वीर जिजामाता प्राणी संग्रहालय येथे यंदा गत दोन वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत महसुलात घट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदाचा महसूल जरी कमी असला तरी अद्यापही तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. आणि या तीन महिन्यांत महसुलात तूट नक्कीच भरून निघेल, असा विश्वास प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. त्रिपाठी यांनी व्यक्त केला. कोरोनानंतर सर्वच प्रेक्षणीय स्थळांकडे मोकळा श्वास घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे २०२२ आणि २०२३ मध्ये त्याचा परिणाम दिसून आला. गेल्या वर्षभरात पर्यटकांसाठी सिंह, लांडगा यासारखे प्राणी बागेत आणू शकलो नाही. यामुळे सुद्धा पर्यटकांचा ओघ कमी असू शकतो. त्याचा फटका बसला असल्याचेही त्रिपाठी यांनी सांगितले. राणीबागेत पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी वाढावी यासाठी निश्चितच प्रयत्न करत आहोत. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या सिंहासाठी नेटाने प्रयत्न सुरू केले आहे, असे त्रिपाठी म्हणाले. शाळेतील मुलांच्या परिक्षा झाल्यानंतर प्रत्यक्ष उन्हाळी सुट्टीत बच्चे कंपनीचा यंदा राणीच्या बागेतील फेरफटका अधिक आनंददायी ठरणार आहे. परिणामी अधिक महसूलही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मार्चपर्यंत सिंह आणण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी आम्ही चक्कर बाग झूलॉजिकल पार्क, जुनागड आणि कमला नेहरू प्राणी संग्रहालय, इंदूर यांच्याशी संपर्कात आहोत. तसेच आता गुजरातहूनदेखील सिंह आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आमच्या प्रयत्नांना यश येईल.

- डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, प्राणी संग्रहालय

logo
marathi.freepressjournal.in