केईएममध्ये आता यकृत, हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया; गरीब, गरजू रुग्णांना दिलासा

परळ येथील पालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच यकृत व हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येणार आहे.
केईएममध्ये आता यकृत, हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया; गरीब, गरजू रुग्णांना दिलासा

मुंबई : परळ येथील पालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच यकृत व हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

परळ येथील केईएम रुग्णालयात दररोज हजारो रुग्णांची तपासणी करण्यात येते. यापैकी गरज असलेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाते. स्वस्त व योग्य उपचार पद्धती यामुळे देशभरातील रुग्ण उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात धाव घेतात. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासह रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत.

सीटीस्कॅन, लॅप्रोस्कोपिक एचडी सेट, हार्ट लंग मशिन, अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन, विविध एन्डोस्कोपी प्रक्रियांसाठी आवश्यक नेजल एन्डोस्कोपी सिस्टम आदींची खरेदी मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत करण्यात येणार आहे. ११० कोटी रुपये इतक्या किमतीच्या ५ एमआरआय मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच केईएम, सायन व नायर या प्रमुख रुग्णालयात कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञानाचा अवलंब करून इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन सेवा सुरू करण्यात येणार आहे. रुग्णसेवेत सुसुत्रीकरण व पारदर्शकता आणण्याकरिता पालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान प्रणाली अंतर्गत सेवांचा अवलंब करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in