यकृताचे दोन भाग करून दोघांचे प्राण वाचवले ;जसलोक रुग्णालयाची किमया

मोठा भाग तरुण माणसाला दिला तर छोटा भाग वाडिया रुग्णालयात पाठवून दिला
यकृताचे दोन भाग करून दोघांचे प्राण वाचवले ;जसलोक रुग्णालयाची किमया

मुंबई : अवयवदान केल्यामुळे अनेकांना जीवदान मिळते, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय जसलोक रुग्णालयात दाखल झालेल्या दोन रुग्णांना मिळाला. जसलोक रुग्णालयात एका मृत व्यक्तीचे यकृत दोघांना देण्यात आले. त्यामुळे दोघांचे प्राण वाचले आहे.

जसलोक रुग्णालयात दोन रुग्णांना लिव्हर सोरायसीस आजार झाला होता. त्यांना यकृत मिळत नव्हते. मात्र, जसलोक रुग्णालयात ६ ऑगस्ट रोजी ५४ वर्षीय व्यक्तीचा मेंदूच्या पक्षाघाताने मृत्यू झाला. जसलोकच्या डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना समजल्यावर त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. मृताच्या भाऊ व पत्नीने ह्रदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला.

जसलोक रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणासाठी एक रुग्ण दाखल झाला होता. त्याला लिव्हर सोरायसीस झाला होता. तीन महिन्यांपासून तो योग्य यकृताच्या अपेक्षेत होता. तर दुसरा रुग्ण परळच्या वाडिया रुग्णालयात सात वर्षांच्या मुलाला तात्काळ यकृत प्रत्यारोपण करायचे होते.

जसलोक रुग्णालयाचे यकृत प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. ए. एस. सोईन यांच्या पथकाने यकृताचे दोन भाग केले. मोठा भाग तरुण माणसाला दिला तर छोटा भाग वाडिया रुग्णालयात पाठवून दिला.

डॉ. सोईन म्हणाले की, यकृताचे दोन भाग करणारी टीम आमच्याकडे आहे. विविध तज्ज्ञांनी हे काम यशस्वीपणे पार पाडले. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशातून या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास प्रोत्साहन मिळेल. याचा फायदा प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या अनेक रुग्णांना होऊ शकेल. भारतात यकृताचे दोन भाग करणे ही शस्त्रक्रिया प्रचलित नाही, मात्र जसलोक रुग्णालयाने याबाबत मोठी झेप घेतली.

सोरायसीस, यकृताने काम बंद करणे, हेपिटायटिस, बिलीरीया अस्ट्रेसिया, यकृताचा कर्करोग, हेप्टोब्लास्टोमा, या गंभीर आजारात यकृत प्रत्यारोपण ही शेवटची आशा आहे.

जसलोक रुग्णालयाचे यकृत प्रत्यारोपण डॉक्टर आभा नागराल म्हणाल्या की, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे यकृताचे दोन भाग करून त्याचे दान करता येऊ शकते. यातून रुग्णांना मोठी आशा मिळू शकते. शस्त्रक्रिया डॉक्टरांवर या शस्त्रक्रियेचे मोठे यश अवलंबून आहे. वैद्यकीय पथकात मोठा समन्वय आवश्यक आहे. ही शस्त्रक्रिया करताना लॉजिस्टीक व तांत्रिकदृष्टया कठीण आहे.

वरिष्ठ यकृत प्रत्यारोपण सल्लागार डॉ. प्रवीण अग्रवाल म्हणाले की, या घटनेतून अवयवदान किती महत्वाचे आहे हे दिसून येते. त्यामुळे अवयवदानाबाबत जनजागृती गरजेची आहे. या प्रकरणात तरुण व लहान मुलाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मुंबईत आम्ही यकृत विभागणी करण्यात तज्ज्ञ आहोत. या तंत्रामुळे मागणी व पुरवठ्यातील दरी कमी होऊ शकेल, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in