Mega Block in Mumbai: उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या

Railway Mega Block: अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

Mega Block of Sunday: मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक (Mumbai Local Mega Block )घेतला आहे.

मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर हार्बर मार्गावर वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यानंतर लोकल पुन्हा मुलुंड डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील या लोकल गंतव्य स्थानावर नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. आणि पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

logo
marathi.freepressjournal.in