'त्या' दिवशी लोकल विनाविलंबाने; मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण

लोकल विलंबाने धावत असल्याच्या वृत्तामुळे प्रवाशांची आणि जनतेची दिशाभूल झाली असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल २४ जून रोजी विनाविलंबाने धावत असल्याचे स्पष्टीकरण वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिले आहे. २४ जून रोजी लोकल विलंबाने धावत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने हे स्पष्टीकरण सादर केले आहे.

लोकल विलंबाने धावत असल्याच्या वृत्तामुळे प्रवाशांची आणि जनतेची दिशाभूल झाली असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. २४ जून रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील उपनगरीय सेवा विनाविलंबाने आणि सुरळीत चालू होत्या, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in