मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण दरम्यान मुख्य आणि हार्बर मार्गावर रात्रीच्या लोकल चालविणार आहे. यामुळे अनंत चतुर्थीनिमित्त गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. १६, १७, १८ सप्टेंबरच्या रात्री लोकल चालविण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परत गणपती विसर्जनाच्या दिवशी १७/१८ (मंगळ/बुध रात्री) चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.
डाऊन मेन लाइनवर १६, १७/१८ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री १.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे ३.१० वाजता पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ठाणे विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री २.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे पहाटे ३.३० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून पहाटे ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे ४.५५ वाजता पोहोचेल. अप मेन लाइनवर १६ आणि १७/१८ सप्टेंबर रोजी कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ कल्याण येथून रात्री १२:०५ वाजता सुटेल आणि मध्यरात्री १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ ठाणे येथून रात्री १ वाजता सुटेल आणि रात्री २ वाजता मुंबई येथे पोहोचेल.