संजय गांधी उद्यानाखाली ४.७ किमी लांब टनेल; पूर्व-पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता महत्त्वपूर्ण ठरणार

पूर्व व पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे.
संजय गांधी उद्यानाखाली ४.७ किमी लांब टनेल; पूर्व-पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता महत्त्वपूर्ण ठरणार
X
Published on

मुंबई : पूर्व व पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळ, थेट पुणे-मुंबई महामार्गावर प्रवास, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली ४.७ किमी लांब आणि ४५.७० रुंदीचा जुळा टनेल साकारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे इंधन व वेळेची बचत होणार असून, पूर्व पश्चिम उपनगराचा पाऊण तासाचा प्रवास गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यामुळे २५ मिनिटांत करणे शक्य होणार आहे. दरम्यान, गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी फायर फायटींग सिस्टम सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी असलेल्या गोरेगाव- मुलुंड जोडरस्ते कामातील तिसऱ्या टप्प्यातील भूमिगत बोगद्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी गोरेगाव नेस्को येथील एक्झिबिशन सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह मंत्री व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग (जीएमएलआर) प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित.

  • प्रकल्पाची एकूण लांबी १२.२० किलोमीटर.

  • संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे एकूण १४ हजार कोटी रुपये खर्च.

  • पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्थानकाजवळील मार्गांसह सध्याच्या उड्डाणपुलाचे (आरओबी) रुंदीकरण.

  • दुसऱ्या टप्प्यात ३० मीटर रुंद रस्त्याचे ४५.७० मीटरपर्यंत रुंदीकरण.

  • टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरीचे बांधकाम.

  • टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किमी लांबीचा तिहेरी मार्गिका (३ बाय ३) असलेला पेटी बोगदा (कट अँड कव्हर) आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांबीचा जुळा बोगदा.

    'असा' असणार गोरेगाव- मुलुंड जोडरस्ता

  • गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांब आणि ४५.७० मीटर रुंदीचा जुळा बोगदा.

  • जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर.

  • हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात असेल.

  • प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील.

  • सुमारे १४.२ मीटर व्यासाच्या बोगदा खोदण्याच्या संयंत्राने (टीबीएम) होणार बोगद्याचे खोदकाम.

  • प्राण्यांच्या सुरक्षित विहारासाठी पशुपथाची निर्मिती.

  • कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे २२ हजार ४०० टनांनी घट होणार.

  • वेळेत आणि इंधनाचीही बचत

  • जुळा बोगद्याच्या निर्मितीसाठी अपेक्षित एकूण खर्च- ६३०१ कोटी रुपये.

  • जुळा बोगद्याचे काम पूर्णत्वास येण्याचा अंदाजित कालावधी- ऑक्टोबर २०२८ पर्यंत.

'असा' होतोय प्रकल्प

  • एकूण स्टेशन सर्वेक्षण, माती तपासणीची कामे, तात्पुरते रस्ते वळविण्याचे काम तसेच प्राथमिक संरेखन (डिझाइन) कार्य प्रगतिपथावर.

  • बोगदा प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता, तळमजला + २३ मजल्यांच्या ७ इमारती आणि तळमजला + ३ मजल्यांची बाजार इमारतीची कामे प्रगतिपथावर

logo
marathi.freepressjournal.in