CJP चे नेते दीपके, दास, रांकाविरोधात लुकआउट नोटीस

शिवाजी पार्क येथे गांधी जयंतीच्या दिवशी आयोजित अनधिकृत आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके आणि सहसंयोजक आशुतोष रांका व सौरव दास यांच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर (एलओसी) जारी केले आहे.
CJP चे नेते दीपके, दास, रांकाविरोधात लुकआउट नोटीस
CJP चे नेते दीपके, दास, रांकाविरोधात लुकआउट नोटीससंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : शिवाजी पार्क येथे गांधी जयंतीच्या दिवशी आयोजित अनधिकृत आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके आणि सहसंयोजक आशुतोष रांका व सौरव दास यांच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर (एलओसी) जारी केले आहे. तिघेही देशाबाहेर जाण्याची शक्यता असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सौरव दास यांना २३ नोव्हेंबर रोजी दिल्ली विमानतळावर ब्रिटनला जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. केंद्रीय गृह मंत्रालयाने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, २२ आणि २३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांच्याविरोधात एलओसी जारी करण्यात आली होती.दोनऑक्टोबरच्या आंदोलनानंतर ३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दीपके, रांका, दास यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि ४०० हून अधिक समर्थकांवर बेकायदा जमाव जमवणे व घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९ व २२३ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ व १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)