मुंब्रा पोलीस ठाण्याच्या ३ पोलीस अधिकारी आणि ७ पोलीस कर्मचाऱ्यांनी मारलेल्या छापेमारीत ६ कोटी रुपयांची लूट

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या ३ पोलीस अधिकारी आणि ७ पोलीस कर्मचाऱ्यांनी मारलेल्या छापेमारीत ६ कोटी रुपयांची लूट

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या ३ पोलीस अधिकारी आणि ७ पोलीस कर्मचाऱ्यांनी मारलेल्या छापेमारीत ६ कोटी रुपयांची लूट केल्याची तक्रार एक महिन्यापूर्वी करण्यात आलेली होती. त्या वादग्रस्त बातमीबाबत बुधवारी ठाणे पोलीस आयुक्तांनी १० जणांना निलंबित केले. तर मुंब्रा पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि एसीपी यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणाबाबत एकही पोलीस वरिष्ठ अधिकारी बोलण्यास तयार नाही.

मुंब्रा बॉम्बे कॉलोनी परिसरातून छापेमारी करत फैजल मेमन नावाच्या इसमाच्या घरातून ३० कोटींची रक्कम सापडली. या कामगिरीवर मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३ अधिकारी आणि १० कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान, तक्रारदाराने २ कोटी देण्याचे सांगितल्यानंतर या बहादूर पोलिसांनी सहा कोटी नेले आणि तक्रारदाराला दाबण्याचा प्रयत्न केला. हे सर्व प्रकरण भूमिगत आणि संशयाच्या धुक्यात अडकलेले होते. अखेर ठाणे पोलीस आयुक्तांनी चौकशी करून या लुटीच्या प्रकरणात समाविष्ट असलेल्या तीन पोलीस अधिकारी आणि ७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून लुटीच्या घटनेचा पर्दाफाश केला.

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक कडलक आणि सहाय्यक आयुक्त व्यंकट आंधळे हे विभागीय चौकशीच्या फेऱ्यात अडकले. सदर प्रकरण ईडी आणि एनआयएकडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर दाऊद टोळीतील हा अंतर्गत वाद असून कामे ही ईडी आणि एनआयएला देण्यात येत असल्याची चर्चा मुंब्रा परिसरात सुरु आहे

प्रकरण ईडी, एनआयएकडे जाणार?

कोट्यवधींची लूट असल्याने आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने या प्रकरणात ईडी हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे १० कोटींची बेहिशोबी रोकड आली कुठून? हवाला प्रकरण तर नाही ना? या प्रश्नामुळे एनआयएसुद्धा या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची शक्यता असल्याची चर्चा मुंब्रा परिसरात सुरु आहे.

Related Stories

No stories found.