दादरमध्ये हरवले पदपथ आणि रस्ते; फेरीवाल्यांचा मोकळ्या जागेवर कब्जा

मुंबई मध्ये अपघातांची मालिका सुरू असतानाच मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरचे रस्ते आणि पदपथावर फेरीवाल्यांनी कब्जा केल्याचे भयानक वास्तव समोर आहे. मुंबईचा गजबजलेला परिसर असलेल्या दादर विभागात नागरिकांना तसेच स्थानिकांना पाय ठेवायला जागा नाही.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पूनम पोळ/ मुंबई

मुंबई मध्ये अपघातांची मालिका सुरू असतानाच मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरचे रस्ते आणि पदपथावर फेरीवाल्यांनी कब्जा केल्याचे भयानक वास्तव समोर आहे. मुंबईचा गजबजलेला परिसर असलेल्या दादर विभागात नागरिकांना तसेच स्थानिकांना पाय ठेवायला जागा नाही. परिणामी अशा ठिकाणी अपघातांची दाट शक्यता असते असे मत पालिकेच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले.

दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील केशवसुत उड्डाणपुलापासून बेस्टच्या बस, टैक्सी आणि दुचाकी वाहनांची ये जा असते. मात्र , या वाहनांना रेल्वेस्थानकाबाहेरील रस्त्यापासून कबुतरखायापर्यंतचा २०० मीटरचा रस्ता पार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला विक्रेते, भाजीपाला विक्रेत्या महिला, फुले आणि पूजेसाठी लागणारी पाने विकणाऱ्या महिला, घरगुती साहित्य आणि घड्याळ विक्रेते, कपडे विक्रेते त्याचप्रमाणे अनधिकृतपणे अन्नविक्रेते यांच बस्तान पाहायला मिळते.

आम्ही अनधिकृत फेरीवाल्यांकडून त्यांचे सामान जप्त करतो. मात्र या परिसरात फेरीवाल्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की आम्ही कारवाई करून पुढे जातो तोच मागे फेरीवाले पुन्हा आपली दुकाने मांडतात.असे मत महापालिका कर्मचाऱ्याने मांडले.

तरीही फेरीवाले हटत नाहीत

अनधिकृत फेरीवाले आणि विक्रेत्यांना जागेवरून हटवण्यासाठी पालिकेतर्फे कारवाई करण्यात येते. अनधिकृत विक्रेत्यांचे साहित्य वारंवार जप्त केले जाते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. तर फेरीवाल्यांकडून विरोध होऊ नये अथवा बळाचा वापर होऊ नये म्हणून पोलीस संरक्षणात कारवाई होते याशिवाय पोलिसही फेरीवाल्यांना सातत्याने हटवतात. मात्र इतके असूनही या परिसरातील फेरीवाले हटताना दिसत नाहीत.

दररोज येथून वरळी भागात प्रवास करतो. कबुतर खान्याजवळ दिसत असलेली बस थांब्यावर यायला २० मिनिटे घेते. बसचा ड्राइवर हॉर्न वाजवून थकतो. पण फेरीवाले हटायचे नावच घेत नाही. यामुळे कामावरून थकून आल्यावरही बसच्या रांगेत उभा राहण्यात जातो.

- सुनील जाधव, बस प्रवासी

logo
marathi.freepressjournal.in