तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'ची शंका; भाजप नेत्यांचा दावा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने तिचा प्रियकर शिझान खानशी वाद झाल्यानंतर सेटवर आत्महत्या केली आणि एकच खळबळ उडाली
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'ची शंका; भाजप नेत्यांचा दावा

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तिचा प्रियकर शिझान खानने तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याची तक्रार तुनिषाच्या आईने केली आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. अशामध्ये आता भाजपच्या काही नेत्यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याची शंका उपस्थित केली आहे. आधी भाजपचे नेते राम कदम यांनी हा दावा केला होता. तर, त्यांच्यानंतर आता भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील हा दावा केला आहे.

भाजप नेते गिरीश महाजन हे म्हणाले की, "हे प्रकरण लव्ह जिहादचा विषय आहे. पोलिसांचा याबाबतीत तपास सुरु आहे. आम्ही बघतो आहोत की, दिवसेंदिवस अशी प्रकरणे वाढतच आहेत आणि आम्ही या विरोधात कडक कायदा आणण्याचा विचार करत आहोत." त्यांच्याशिवाय भाजप नेते राम कदम हे म्हणाले की, "पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करतील. तसेच चौकशीत लव्ह जिहादचा अँगल समोर आला तर त्यादृष्टीने देखील सखोल चौकशी होईल. लव्ह जिहादच्या मागे कोणती संघटना आहे का? त्यांचे काय षडयंत्र आहे? याचाही तपास पोलिस करतील आणि तुनिषाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील," अशी टीका त्यांनी केली आहे.

२४ डिसेंबर रोजी दुपारी तुनिषाने वसई येथे मालिकेचे चित्रीकरण सुरु असताना सेटवरच आत्महत्या केली. यामुळे सिनेक्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली. तिचा कथित प्रियकर शिझान खानची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीसांच्या तपासात काय निष्पन्न होते, हे समोर येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in