

मुंबई : प्रवासी सुविधांचा विस्तार आणि विविध पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे २४ ते २६ जून या कालावधीत ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. तर काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
हा ब्लॉक २४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २६ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. यामध्ये शंटिंग नेकचे बांधकाम, सिक साइडिंगमध्ये बदल, देखभाल साइडिंग यार्डाचा विस्तार, लाइन्सचे पिट विस्तारकाम तसेच पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या निचरा वाहिन्यांचे स्थलांतर अशी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच आहे. स्टेशनवर येण्याचे आवाहन केले
या गाड्या २३ जूनला ठाणे स्थानकावरच 'शॉर्ट टर्मिनेट' होणार
१२६२० मंगळुरू सेंट्रल एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस
२२१८० चेन्नई - एलटीटी एक्स्प्रेस
१६३४६ तिरुवनंतपुरम एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस
१५०१८ गोरखपूर एलटीटी एक्स्प्रेस
वेळेत बदल
१२१४१ एलटीटी- पाटलीपुत्र एक्स्प्रेस ही २४ जून रोजी रात्री ११.३५ वाजता सुटणारी गाडी आता २५ जून रोजी पहाटे ३.३० वाजता सुटेल.