लम्पी चर्मरोगास घाबरण्याची गरज नाही; तिन्ही गाई लम्पीमुक्त झाल्या

हा रोग प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने सदर रोग होण्याची भीती नसल्याचे पेठे यांनी सांगितले.
लम्पी चर्मरोगास घाबरण्याची गरज नाही; तिन्ही गाई लम्पीमुक्त झाल्या
Published on

मुंबईत लम्पी विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर तीन गाईंना लम्पीची लागण झाली होती; मात्र योग्य उपचार पद्धतीमुळे तिन्ही गाई लम्पीमुक्त झाल्या आहेत, तर आतापर्यंत ३,२२६ पैकी ३,२०६ गाईंचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी दिली. दरम्यान, लम्पी चर्मरोग हा केवळ गाईंना होत असून आजपर्यंत म्हैसवर्गीय प्राण्यांमध्ये हा रोग आढळून आलेला नाही. हा रोग प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने सदर रोग होण्याची भीती नसल्याचे पेठे यांनी सांगितले.

आरे दुग्ध वसाहतीतील सर्व गोवर्गीय जनावरांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलेले असून, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोशाळा व गोठ्यांमधील गोवर्गीय जनावरांचे लसीकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने पूर्ण केलेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in