'माझी चित्र निर्मिती' कलाप्रदर्शनाला सुरूवात

४० वर्षांच्या कला प्रवासात त्यांनी काढलेल्या विविध विषयांवरील वेगवेगळ्या माध्यमातील व शैलीतील चित्रांचा या प्रदर्शनात समावेश
'माझी चित्र निर्मिती' कलाप्रदर्शनाला सुरूवात

मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे जेष्ठ चित्रकर्ती शोभा पत्की यांच्या चित्रांचे एकल प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 'माझी चित्रनिर्मिती' प्रदर्शनाला मंगळवार २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. हे प्रदर्शन ५ डिसेंबरपर्यंत रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य रसिकांना पाहता येणार आहे. त्यांच्या ४० वर्षांच्या कला प्रवासात त्यांनी काढलेल्या विविध विषयांवरील वेगवेगळ्या माध्यमातील व शैलीतील चित्रांचा या प्रदर्शनात समावेश केला आहे.

प्रस्तुत चित्र प्रदर्शनात पत्की यांनी ज्यूट, प्लॅस्टर, कापड, माती, ॲल्युमिनियम, तेलरंग, मिक्स मिडियम अशा माध्यमांचा कलात्मक वापर केला आहे. आपली आशयघन चित्रे अपेक्षित व सौंदर्ययुक्त आविष्काराने अलंकृत केले आहेत. अनेक विविधलक्षी व आकर्षक विषयांवर आधारित असलेल्या त्यांच्या चित्रसंपदेत भारतीय संस्कृती व परंपरा, धार्मिक संकल्पना, निसर्गवैभव, ऋतुचक्र, रागमाला, ब्रह्मांड वगैरेंचे रम्य व आकर्षक दर्शन सर्वांना घडते. पारंपारिकतेला आधुनिकतेचा साज चढवून त्यातून साकारलेली कलारूपे भारतीय कला संस्कृतीचे वैभव व रूढी परंपरेचे महत्त्व आणि गौरवशाली ऐतिहासिक परंपरा वगैरे फार उत्कटतेने त्यांनी प्रदर्शित केली असून योग्य रंग लेखनातून व पोतातून तसेच अन्य आविष्कारातून दिलेली ती सौंदर्यपूर्ण कलारूपे त्यांनी साकारली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in