धुळीवर नियंत्रणासाठी भाडेतत्त्वावर मशीन

४ यंत्रे ही भाडेतत्वावर घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
धुळीवर नियंत्रणासाठी भाडेतत्त्वावर मशीन

मुंबई : हवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी एंटी स्मोग मशीन घेण्यात येणार आहेत; मात्र ३० मशीन प्रत्यक्ष सेवेत येईपर्यंत दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे धुळीचे कण पसरु नये यासाठी भाडेतत्त्वावर धूळ नियंत्रीत मशीन घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तब्बल २४ विभाग कार्यालयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे २४ मशीन भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे.

हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी पालिकेनेही मार्गदर्शक धोरण जाहीर करतानाच महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी महापालिकेला धूळ प्रतिबंधक यंत्रे कार्यान्वित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. तसेच प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी पुढील १५ दिवसांत धूळ प्रतिबंधक यंत्र बसवण्याचेही निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार मुंबई पालिकेने ३० धूळ प्रतिबंधक यंत्र खरेदीचा निर्णय घेत यासाठीची निविदा प्रक्रिया राबवली. ही निविदा अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु कार्यादेश बजावल्यानंतर १८० दिवसांच्या आत या यंत्रांचा पुरवठा करावा अशाप्रकारची अट निविदेत आहे. त्यामुळे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी यासाठी अपेक्षित आहे. त्यामुळे सध्याच्या वाढत्या हवेतील प्रदुषणाचे प्रमाण पाहता महापालिकेने कायमस्वरुपी यंत्रे महापालिकेच्या ताब्यात येईपर्यंत भाडेतत्वावर अशाप्रकारच्या यंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारची २४ यंत्रे ही भाडेतत्वावर घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in