मुंबईत होणार स्व:ताचे घर; 22 मे पासून अर्ज भरण्यास सुरवात

या अर्जाची सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात 18 जूलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास काढण्यात येणार आहे.
मुंबईत होणार स्व:ताचे घर; 22 मे पासून अर्ज भरण्यास सुरवात

माडाकडून विविध उत्पन्न असलेल्या गटातील नागरिकांसाठी 4083 घरांची सोडत जारी करण्यात आली आहे. यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 22 मे पासून सुरुवात करण्यात येणार आहे. 22 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. हे अर्ज 22 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास माडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. या अर्जाची सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात 18 जूलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलींद बोरीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विक्रोळीच्या कन्नमवारनगर, गोरेगाव पहाडी, अँटॉप हिल, मालाड, दादर, बोरीवली, सायन परळ, ताडदेव या ठिकाणी माडाची ही घरे आहेत.

माडाच्या https://housing.mhada.gov.in आणि https://www.mhada.gov.in या संकेतस्थळावर याबाबतची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना घरांसाठी अर्ज भरायचे आहेत यांनी या संकेस्थळावर जाऊन सविस्तर माहिती पाहण्याचे आवाहन माडाकडून करण्यात आले आहे. यंदा माडाच्या घरांची सोडत ही संगणकाच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही सोडत माडा कडून सोपी, सरळ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. त्यासाठी माडाकडून संगणकीय प्रणालीमध्ये महत्वपुर्ण बदल करण्यात आले आहेत. आत्याधुनीक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे बदल करण्यात आले आहेत.

माडाच्या मुंबईतील घरांची शेवटची सोडत 2019 मध्ये काढण्यात आली होती. मागील एक वर्षपासून माडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची सोडत निघणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र काही कारणास्तव या प्रक्रियेला उशिर झाला. 2019 मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीत केवळ 217 घरांचा समावेश होता. मात्र आता 4083 घरांच्या जाहिरातीची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. 22 मे सोमवारपासून यासाठीची प्रक्रिया सुरु होणार आहे.

माडाकडून सोडत जाहीर करण्यात येणाऱ्या 4083 घरात अल्प उत्पन्न असणाऱ्या गटासाठी 1034 तर अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या गटासाठी 2790 घरांची सोडत निघणार आहे. अल्प उत्पन्न गटासाठी नऊ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक असणार आहे. तर अत्यल्प उत्पन्न असलेल्या गटासाठी वार्षिक सहा लाखांपर्यंत उत्पन्न असण्याची आवश्यक आहे. गोरेगाव पहाडी भागातील पंतप्रधान आवास योजनेतील अत्यल्प गटातील 1947 घरांची किंमत अडीच लाखांचे अनुदान वजा करता 30 लाख 44 हजार रुपयांपासून ते 40 लाख रुपयांपर्यंत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in