महालक्ष्मी रेसकोर्स विभागाचे सौंदर्यीकरण होणार

पाहिल्या टप्प्यात काही काम पूर्ण करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात प्रोमेनेड विकास करण्यात येणार आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स विभागाचे सौंदर्यीकरण होणार

महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात महालक्ष्मी पूल ते रंखारी चौकापर्यंत पदपथाचा वापर अनधिकृतपणे होत आहे. त्यामुळे ‘जी दक्षिण’ विभागामार्फत नागरिकांना सदर पदपथाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार पाहिल्या टप्प्यात काही काम पूर्ण करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात प्रोमेनेड विकास करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.

जी दक्षिण विभागातील नागरिकांना महालक्ष्मी रेसकोर्समधील विहंगमय दृश्य पाहता यावे, यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स येथे विविध कामे हाती घेण्यात आली. पदपथ सौंदर्यीकरण, परिसरात भिंतीचे नूतनीकरणाचे काम, सायकल ट्रॅक, सजावटीसह ग्रील, जिम, विद्युतीकरण, हरित बस थांबा, दर्शक गॅलरी इत्यादीची कामे ही फेज एकमध्ये पूर्ण करण्यात आली.

तेथील आणखी काही कामे करण्याच्या उद्देशातून फेज दोनचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यात महालक्ष्मी रेसकोर्सच्या लाला लजपतराय मार्ग प्रवेशापर्यंत रॅमिनेट विकास करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. फेज एकमध्ये सायकल ट्रॅकला जोडणारा वॉकवे आणि सायकल ट्रॅकचा विकास शोभेच्या ग्रीलसह कम्पाउंडची भिंत दुरुस्ती पादचाऱ्यांची सुरक्षा वाहतूक सुरळीत करण्यासाठी कामाची रचना तयार आराखडा करण्यासाठी ‘मलक गिल’ यांची नियुक्ती करण्यात आली.

खुशबू इंटरप्राईजेस यांना कंत्राट

त्यासाठी सहा कोटी २८ लाख सात हजार रुपये रकमेचे अंदाजपत्र तयार करण्यात आले. तीन लिफाफा पद्धतीने ई-निविदा मागवण्यात आल्या. १६ जून रोजी तीन निविदाकारांकडून प्रतिसाद मिळाला, त्यानंतर मे खुशबू इंटरप्राईजेस यांनी सहा कोटी २४ लाख ९२ हजार ९६५ रुपये या कमी दराने निविदा भरलेली असल्याने त्यांना हे कंत्राट देण्यात आले.

कर व अन्य खर्च मिळवता संपूर्ण कामाच्या खर्चासाठी सात कोटी ९२ लाख ९१ हजार ७६ रुपये लागणार आहेत. त्याचसोबत कामाचा कालावधी पावसाळा सोडून सहा महिन्यांचा असणार आहे. त्यामुळे कंत्राटदाराला ठरवून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण करावे लागणार आहे. यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून तो पालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in