महालक्ष्मी रेसकोर्सखाली भूमिगत पादचारी मार्ग; वरळीतील सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते सागरीकिनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत जोडणी

महालक्ष्मी रेसकोर्सवर प्रस्तावित सेंट्रल पार्क उभारल्यानंतर नागरिक आणि पर्यटकांना या परिसरात सहज पोहोचता यावे, तसेच वरळीतील सायन्स सेंटर मेट्रो स्थानक आणि सागरीकिनारा मार्गाच्या विहारपथाशी जोडणी व्हावी, यासाठी तब्बल ७०२ कोटी ४४ लाख ३५ हजार रुपयांचा भूमिगत पादचारी मार्ग उभारण्यात येणार आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सखाली भूमिगत पादचारी मार्ग; वरळीतील सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते सागरीकिनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत जोडणी
महालक्ष्मी रेसकोर्सखाली भूमिगत पादचारी मार्ग; वरळीतील सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते सागरीकिनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत जोडणी
Published on

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सवर प्रस्तावित सेंट्रल पार्क उभारल्यानंतर नागरिक आणि पर्यटकांना या परिसरात सहज पोहोचता यावे, तसेच वरळीतील सायन्स सेंटर मेट्रो स्थानक आणि सागरीकिनारा मार्गाच्या विहारपथाशी जोडणी व्हावी, यासाठी तब्बल ७०२ कोटी ४४ लाख ३५ हजार रुपयांचा भूमिगत पादचारी मार्ग उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) करणार असून, त्यासाठीचा संपूर्ण निधी मुंबई महापालिकेकडून उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र, महापालिकेवर आधीच असलेल्या आर्थिक भाराच्या पार्श्वभूमीवर या खर्चाला काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. दरम्यान, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

महालक्ष्मी रेसकोर्समार्गे अ‍ॅक्वा लाइनवरील सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते सागरीकिनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत हा भूमिगत मार्ग प्रस्तावित आहे. यासंदर्भात २८ जुलै २०२५ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली होती.

मेट्रो-३ ला आठ भुयारी मार्गांची जोडणी

जुलै २०२५ मध्ये महापालिका मुख्यालयात एमएमआरसीएलसोबत झालेल्या बैठकीत मेट्रो स्थानकांना विविध व्यावसायिक आणि निवासी संकुलांशी भूमिगत पादचारी मार्गाने जोडण्याबाबतही चर्चा झाली होती. त्यानंतर मेट्रो-३ मार्गावरील वरळी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि अंधेरी एमआयडीसी परिसरातील विविध संकुलांना भुयारी मार्गाने जोडण्याचे प्रस्ताव पुढे आले. यामध्ये वरळीतील चार, बीकेसीमधील तीन मार्ग जोडण्याचे नियोजन आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in