महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्टच्या जादा गाड्या; अनुयायांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्टच्या वतीने ५ व ६ डिसेंबरला अधिकच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत तसेच मागील वर्षीच्या तुलनेत अधिक विद्युत व्यवस्था आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्टच्या जादा गाड्या; अनुयायांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्टच्या जादा गाड्या; अनुयायांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्टच्या वतीने ५ व ६ डिसेंबरला अधिकच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत तसेच मागील वर्षीच्या तुलनेत अधिक विद्युत व्यवस्था आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

दादर येथील चैत्यभूमी परिसरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी उभारण्यात येणारे मंडप, तंबूंना निवासी दराने तात्पुरता विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी दादर येथील ग्राहक सेवा जी-उत्तर विभाग कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन बेस्टने केले होते तसेच शिवाजी पार्क, चैत्यभूमी, दादर चौपाटी, राजगृह, दादासाहेब फाळके मार्ग, आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि मादाम कामा मार्ग इत्यादी ठिकाणी यावर्षी १५० वाॅटचे एकूण ७८१ एलईडी मार्गदर्शक दिवे आणि २००० वाॅटचे तीन मेटल हलाईड अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसवण्यात येणार आहे, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.

अशा चालवणार गाड्या

दादर चैत्यभूमी येथे जाण्यासाठी ५ डिसेंबर रात्री १० पासून शनिवार, ६ डिसेंबर रोजी सकाळी ६ पर्यंत बसमार्ग क्रमांक ए-४ ए-२०२, ए-२४१, ए-३५१, ए-३५४ व ए -३८५ वर एकंदर १७ बसगाड्या चालविण्यात येणार आहेत आणि शनिवार, ६ डिसेंबर रोजी बसमार्ग क्रमांक २८, एसी-३३, ए-१६४, ए-२४७, सी-३०५, ए-३५१, ए-३५४, ए-३५७, ए-३८५, सी-४४० आणि सी-५२१ वर एकूण ४२ जादा बसगाड्या प्रवर्तित करण्यात येणार आहेत.

१० विशेष गाड्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील स्मृतिस्थळांना व दक्षिण मुंबईतील पर्यटनस्थळांना भेट देता यावी यासाठी ५ व ६ डिसेंबर रोजी उपक्रमातर्फे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून डॉ. बाबासाहेब स्मृतिस्थळ दर्शनसाठी एकूण १० विशेष, वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या चालविण्यात येणार आहे. त्याचे प्रवासी भाडे प्रतिप्रवासी ७५ रुपये आहे तसेच यावेळी बेस्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून अनुयायांना प्रवासासाठी आवश्यक माहिती देण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in