मुंबईत कोरोनाचे दिवसभरात १,९५६ नवे रुग्ण

महाराष्ट्रात 3,081 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद
 मुंबईत कोरोनाचे दिवसभरात १,९५६ नवे रुग्ण
File PhotoANI

मुंबई : मुंबईत कोरोनाचा चढ-उतार चालूच असून, गुरुवारी शहरात 1,702 रुग्ण आढळले होते. मात्र शुक्रवारी यामध्ये 254 रुग्णांची भर पडल्याने दिवसभरात मुंबईत 1,956 नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत 10 लाख 77 हजार 199 कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या 19,570 वर स्थिरावली आहे. दिवसभरात 763 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 10 लाख 48 हजार 438 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या नऊ हजार 191 सक्रिय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात 3,081 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद करण्यात आली, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 13,329 झाली. याशिवाय, दिवसभरात 0 कोविड-19 मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात 1,323 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 77,43,513 झाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in