विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिसूचना; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ तारखेपर्यंत मुदत

नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत आहे. तर छाननी ३० ऑक्टोबरला आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत आहे. मतदान २० नोव्हेंबरला, तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिसूचना; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ तारखेपर्यंत मुदत
@ANI
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम १५ तारखेला जाहीर केला होता. 

नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत आहे. तर छाननी ३० ऑक्टोबरला आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत आहे. मतदान २० नोव्हेंबरला, तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ७ ऑगस्ट रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम अन्वये, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना मुंबई उपनगर व  मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्यांकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून अधिसूचित केले आहे. त्यानंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई उपनगर व मुंबई शहराकरीता  १२ ऑगस्ट रोजीच्या अधिसूचनेनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना आणि जिल्हाधिकारी, उपनगर व शहर यांना अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून अधिसूचित केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in