नालासोपारातील भाजपचे उमेदवार राजन नाईक यांचा दणदणीत विजय ; क्षितीज ठाकूर यांचा दारुण पराभव

Maharashtra Assembly Elections Results 2024: नालासोपारा विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजन नाईक हे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांचा ३७००५ मतांनी दारुण पराभव करीत विजयी झाले आहेत. सन २००९ साली नालासोपारा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर, परदेशातून उच्चविद्याविभूषित होऊन आलेले आपले पुत्र क्षितीज ठाकूर यांना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारी दिली होती.
राजन नाईक
राजन नाईक
Published on

वसई : नालासोपारा विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजन नाईक हे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांचा ३७००५ मतांनी दारुण पराभव करीत विजयी झाले आहेत. सन २००९ साली नालासोपारा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर, परदेशातून उच्चविद्याविभूषित होऊन आलेले आपले पुत्र क्षितीज ठाकूर यांना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारी दिली होती. या पूर्वीच्या निवडणुका आ. क्षितीज यांनी जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत बविआच्या तीन्ही आमदारांना जनतेने घरी बसवले आहे.

भाजप उमेदवार राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांचा दणदणीत पराभव केला आहे. राजन नाईक यांना १,६४,२४३ एकूण मत मिळाली तर आमदार क्षितीज ठाकूर १,२७,२३८ मते मिळाली आहेत. व राजन नाईक यांनी आमदार क्षितीज ठाकूर यांचा ३७००५ मतांनी आघाडीवर राहून पराभव केला.

'कॅश कांड'...महागात पडले?

निवडणुकीच्या एक दिवस अगोदर भाजप राष्ट्रीय सचिव विनोद तावडे हे विरार येथील हॉटेलमध्ये नालासोपारामधील उमेदवार राजन नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. त्यावेळी बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी तावडे हे पैसे वाटप करण्यासाठी आले आहेत, असा आरोप केला. विरार येथील विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, आमदार क्षितीज ठाकूर यांनी मोठ्या संख्येने हॉटेलला घेराव घातला. त्याचबरोबर हॉटेलमध्ये घुसून विनोद तावडे यांची चौकशी केली, संपूर्ण हॉटेल तपासले आणि एकनाथ शिंदे गटाच्या वसई तालुकाप्रमुख सुदेश चौधरी आणि भाजप नालासोपारा मंडळ अध्यक्ष नारायण मांजरेकर यांना मारहाण करण्यात आली. जवळपास तीन तास विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांना बहुजन विकास आघाडीच्या मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांनी घेरले होते. या एकंदर प्रकरणाची सहानुभूती भाजपचे उमेदवार राजन नाईक यांना मिळाल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in