आमच्याकडेही जोडो आहेत; काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात भाजपविरोधात आक्रमक

काल भाजपने केलेल्या विधानभवन परिसरात राहुल गांधींविरोधात जोडो मारो आंदोलन केले होते, याचा निषेध महाविकास आघाडीने विरोध केला
आमच्याकडेही जोडो आहेत; काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात भाजपविरोधात आक्रमक

आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आज राहुल गांधींच्या मुद्द्यावरून चांगलाच गाजला. त्यांची खासदारकी रद्द केल्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनी या निर्णयाचा निषेध केला. यावेळी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात चांगलेच आक्रमक झालेले दिसले. ते म्हणाले, "विधीमंडळाच्या आवारात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रयत्न झाला. त्या सदस्यांवर कारवाई करण्यात यावी," अशी मागणी त्यांनी केली. तसेच, "आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत, एवढं लक्षात ठेवा, आम्ही आजवर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन केले," असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशाराही दिला होता.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, "गुरुवारी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर आम्ही लगेच विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार करत राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारणाऱ्या या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी गुरुवारी संध्याकाळपर्यंत यावर निर्णय घेऊ, असे सांगितले होते. नंतर पुन्हा एकदा शुक्रवारी सकाळी निर्णय घेऊ, असे सांगितले होते. मात्र, या आमदारांवर कारवाई झालेली नाही. मुळात विधानसभा अध्यक्षांची या आमदारांवर कारवाई करण्याची इच्छा दिसत नाही. विधानसभा अध्यक्षांचे वर्तन हे पक्षपातीपणाचे दिसते आहे. म्हणून आम्ही सभात्याग केला." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in