विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भास्कर जाधव झाले नतमस्तक; नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले आणि माघारी फिरले, माध्यमांशी बोलताना सांगितले खरे कारण
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भास्कर जाधव झाले नतमस्तक; नेमकं प्रकरण काय?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. अशामध्ये आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी केलेल्या कृत्याची चांगलीच चर्चा झाली. यावेळी ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले आणि हाथ जोडले. त्यानंतर ते माघारी फिरताना, 'आता या सभागृहात येण्याची इच्छा नाही,' असे म्हणत तिथून निघून गेले. त्यांनी केलेल्या या कृतीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, "मी आज मी सभागृहातून बाहेर पडलो. उद्या गुढीपाडवा आहे त्यानंतर ३ दिवस सभागृह असणार आहे. पण आता मी गावी निघालो असून पुन्हा येणार नाही. याचे कारण आता या सभागृहात येण्याची इच्छाच राहिलेली नाही. मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नव्हते, मला विषयही मांडू दिले जात नव्हते. मी नियमाने बोलण्याचा प्रयत्न करत असूनही हे अधिवेशन, कामकाज चालावे यासाठी मी नियमात राहून लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला. पण, ती लावली जात नाही आहे. म्हणून मी आता यापुढे सभागृहात येणार नाही," अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in