Maharashtra Budget Session : सीमाभागामध्ये योजना राबवणार; राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात

Maharashtra Budget Session : सीमाभागामध्ये योजना राबवणार; राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session) आजपासून सुरुवात झाली असून शिंदे- फडणवीस सरकार तसेच राज्यपाल रमेश बैस यांचे पहिले अभिभाषण

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) आजपासून सुरु झाले आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची उपस्थित आहेत. तर, यावेळी नव्या राज्यपालांनी राज्य सरकारचे कौतुक केले आहेत. त्यांनी केलेल्या अभिभाषणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

राज्यपाल रमेश बैस अभिभाषणामध्ये म्हणाले की, "कोरोनानंतर युवकांना रोजगार देणे हा सरकारचा हेतु असल्याचे सांगत ७५ हजार नोकर भरतीचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, आंबेडकर यांच्यासह अनेक समाज सुधारकांच्या सिद्धांतावर चालणारे आहे. सीमाभागातील नागरिकांना सेवा सुविधा देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यासाठी राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. तसेच, राज्यात विविध क्षेत्रामध्ये भरती सुरू करण्यात आली आहे." असे ते म्हणाले.

पुढे राज्यपाल म्हणाले की, "यावर्षी जानेवारीमध्ये १ लाख ३५ हजारांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. मराठा समाजासाठी राज्य सरकारने विशेष योजना जाहीर केल्या आहेत. तर, युवकांसाठी गडचिरोली, गोंदियामध्ये प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली आहेत. राज्याच्या पेन्शन योजनेतही राज्य सरकारकडून बदल करण्यात आले आहेत. मैत्री योजनेतून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबईकरांसाठी आपला दवाखाना योजना राबवली आहे. तसेच, आर्थिक सल्लागार समितीची घोषणादेखील केली आहे." असे अनेक मुद्दे त्यांनी आपल्या या भाषणामध्ये मांडले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in