विधानभवनात ठाकरे-फडणवीसांचा एकत्र प्रवेश; चर्चांना उधाण

२०१९नंतर आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र पाहायला मिळाले, यावेळी आदित्य ठाकरेदेखील सोबत होते
विधानभवनात ठाकरे-फडणवीसांचा एकत्र प्रवेश; चर्चांना उधाण

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दिवशी विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. त्या दोघांनी एकत्रच विधानभवनात प्रवेश केल्यामुळे चर्चांना उधाण आले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेदेखील होते. विशेष म्हणजे, दोघेही एकमेकांसोबत हसत हसत संवाद करत विधानभवनात दाखल झाले. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून, हा निव्वळ योगायोग असल्याचे मत भाजपकडून व्यक्त करण्यात आले.

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. अशामध्ये आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१९नंतर पहिल्यांदाच या दोघांना एकत्र पाहायला मिळाले. कारण, २०१९च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपशी युती तोडून राष्ट्रवादी-काँग्रेससोबत हात मिळवणी केली होती. यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच दुरावा निर्माण झाला होता. मात्र आज इतक्या वर्षांनी दोघांनाही एकत्र पाहायला मिळाल्याने चांगल्याच चर्चा रंगल्या. विशेष म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in