अटल सेतू परिसरात तिसरी, तर पालघरमध्ये चौथी मुंबई वसवणार; मुंबईसह पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो विस्तारणार- मुख्यमंत्री

अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे चौथी मुंबई वसवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. तसेच मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था १४० वरून ३०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुंबई, पुणे व नागपूर येथे ४९० किमी मेट्रोचे जाळे विस्तारणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.
अटल सेतू परिसरात तिसरी, तर पालघरमध्ये चौथी मुंबई वसवणार; मुंबईसह पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो विस्तारणार- मुख्यमंत्री
अटल सेतू परिसरात तिसरी, तर पालघरमध्ये चौथी मुंबई वसवणार; मुंबईसह पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो विस्तारणार- मुख्यमंत्री'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे चौथी मुंबई वसवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. तसेच मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था १४० वरून ३०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुंबई, पुणे व नागपूर येथे ४९० किमी मेट्रोचे जाळे विस्तारणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. तसेच पुण्यात खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मार्गावर हडपसर ते लोणीकाळभोर व हडपसर बस डेपो ते सासवड या दोन उपमार्गिकांना मान्यता दिली.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे तलासरी मार्गाचे काम २०२७ अखेरपर्यंत पूर्ण होईल. अटलबिहारी वाजपेयी अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्यात येईल आणि वाढवण जिल्हा, पालघर येथे चौथी मुंबई विकसित करण्यासाठी लॉजिस्टिक आणि विकास केंद्रे निर्माण करण्यात येतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मेट्रो मार्गांसंबंधी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबई ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा मेट्रो ८ यासाठी २२ हजार ८६२ कोटी किमतीचा प्रकल्प उभारणार. वडाळा ते गेट ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका ११ यासाठी २३ हजार ४८७ कोटी किमतीचा भूमिगत प्रकल्प उभारणार असून या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्विकास प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगर स्थानक आणि वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याची योजना आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड भूयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून ठाणे ते बोरिवली या १८ हजार ८३८ कोटींच्या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याशिवाय वांद्रे वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक, वांद्रे कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भूयारी मार्गाने जोडण्यात येईल.

दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्यासाठी छेडा नगर ते आनंद नगर आणि आनंद नगर ते साकेत, ठाणे उन्नत मार्गाचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in