दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा; मंत्रिमंडळात घेतले 'हे' निर्णय

राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती
दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा; मंत्रिमंडळात घेतले 'हे' निर्णय

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एक मोठी घोषणा केली. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारनेही दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. तसेच, बी. एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळणार असल्याचादेखील निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीमध्ये शेती पंपाना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येणार आहे. २०२५पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, पुनर्जीवित किंवा पुनरर्चित साखर कारखाना, सूतगिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमणार असून सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील अकृषि विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात येणार असून असे अनेक निर्णय यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in