Balasaheb Thorat : मोठी बातमी! काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; बाळसाहेब थोरातांनी दिला विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या राजीनाम्याच्या बातमीवर दिला नकार
Balasaheb Thorat : मोठी बातमी! काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; बाळसाहेब थोरातांनी दिला विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीवरून काँग्रेसचे (Congress) अंतर्गत राजकारण सर्वांसमोर आले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवसादिवशी त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेत विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता महाराष्ट्रात काँग्रेसला दणका बसणार असून अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

एकीकडे कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक जवळ अली असताना नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचा वाद समोर आला आहे. बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस हाय कमांडला पत्र लिहले असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर आता थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामाच दिला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

प्रसारमाध्यमांनी बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या बातमीवर नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी सर्वात आधी थोरातांना वाढिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, "बाळसाहेबांचा राजीनामा आमच्याकडे आलेला नाही. तर त्यांनी लिहिलेले पत्रदेखील आमच्यापर्यंत आलेले नाही. आमची बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा झालेली नाही. ते आमच्याशी बोलतच नाही. आम्ही कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या तयारीत आहोत. त्यामुळे आमचा काहीही संपर्क नसून यासंबधी फक्त बातम्या येत आहेत." पुढे ते म्हणाले की, "अशा अफवा पसरवण्याचे काम भाजपचे आहे. सध्या काँग्रेस हायकमांड याकडे लक्ष देत असून मी याकडे लक्ष देत नाही. काँग्रेस पक्षाने दिलेले काम मी करतो आहे. बाकी मला काही माहिती नाही." असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in