अध्यक्ष, सदस्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द; महाधिवक्त्यांचे मत घ्या; ग्राहक पंचायतची मागणी

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्हा आयोगातील अनेक अध्यक्ष/सदस्यांच्या केलेल्या सर्व बदल्या रद्द करण्यात आल्याचे नुकतेच घोषित केले असून या सर्व बाधित अध्यक्ष आणि सदस्यांना त्यांच्या मूळ पदस्थापनेच्या जिल्हा ग्राहक आयोगांत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
अध्यक्ष, सदस्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द;  महाधिवक्त्यांचे मत घ्या; ग्राहक पंचायतची मागणी
अध्यक्ष, सदस्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द; महाधिवक्त्यांचे मत घ्या; ग्राहक पंचायतची मागणीसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्हा आयोगातील अनेक अध्यक्ष/सदस्यांच्या केलेल्या सर्व बदल्या रद्द करण्यात आल्याचे नुकतेच घोषित केले असून या सर्व बाधित अध्यक्ष आणि सदस्यांना त्यांच्या मूळ पदस्थापनेच्या जिल्हा ग्राहक आयोगांत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्राहक न्यायालयांत अध्यक्ष/सदस्यांच्या नेमणुकीं सदर्भात पुन्हा एकदा पेच प्रसंग निर्माण झाला असून त्याचा परिणाम न्यायालयांतील प्रलंबित सुनावण्यांवर होणार आहे.

अध्यक्ष वा सदस्यांनी तक्रारींची सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवलेल्या प्रकरणात आता फेरसुनावणी घेणे भाग पडणार आहे. त्यामुळे या निणर्याबाबत महाधिवक्त्यांचे मत घ्या, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतने केली आहे.

नागपूर खंडपीठाने २२ जूनला दिलेल्या निर्देशानुसार या बदल्या रद्द करण्यात येत असल्याचे शासनाने म्हटले आहे. ग्राहक तक्रार निवारण आयोगांचे कामकाज नि:पक्षपातीपणे होण्यासाठी शासनाने २०२५ रोजी निर्णय घेतला की, ग्राहक आयोगाचे अध्यक्ष वा सदस्य ज्या जिल्ह्याचे मूळ रहिवासी असतील अथवा ज्या जिल्ह्यातील ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये नेमणूक होण्यापूर्वी त्यांनी वकिलीचा व्यवसाय केलेला असेल तिथेच त्यांची नेमणूक करता येणार नाही. 

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)