घर कोसळण्याच्या दुर्घटनेत ७६ जणांचा मृत्यू; ३३९ जण जखमी, साडेपाच वर्षांत १,१७५ घटना

दरवर्षी पावसाळ्यात घरे किंवा घरांचा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. जानेवारी २०२१ ते जुलै २०२६ पर्यंत घर कोसळण्याच्या तब्बल १,१७५ दुर्घटना घडल्या असून साडेपाच वर्षांत ७६ जणांचा मृत्यू झाला, तर ३३९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
घर कोसळण्याच्या दुर्घटनेत ७६ जणांचा मृत्यू; ३३९ जण जखमी, साडेपाच वर्षांत १,१७५ घटना
'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात घरे किंवा घरांचा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. जानेवारी २०२१ ते जुलै २०२६ पर्यंत घर कोसळण्याच्या तब्बल १,१७५ दुर्घटना घडल्या असून साडेपाच वर्षांत ७६ जणांचा मृत्यू झाला, तर ३३९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, २०२६ च्या सात महिन्यात घर कोसळण्याच्या तब्बल ६०९ घटना घडल्या असून ८ जण दगावले, तर २७ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज

यंदा ५ जुलै रोजी मुंबईतील मानखुर्द परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर इमारतीचा भाग कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता. पावसाळ्यात जुन्या इमारती, झोपड्या आणि कमकुवत बांधकामांना धोका वाढत आहे. त्यामुळे याकडे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी गंभीर इशारा म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे.

दरड कोसळण्याच्या घटना

  • २०२१ ते ७ जुलै २०२६

  • एकूण घटना : ९५

  • जखमी : २१

  • मृत्यू : ३१

झाडे/झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना

  • २०२१ ते ७ जुलै २०२६

  • एकूण घटना : ८,८३५

  • जखमी : १४४

  • मृत्यू : ११

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in