मंत्रालयात प्रवेशाचे लंपास केलेले कार्ड परत करण्यास सुरुवात; दूरवरच्या अभ्यागतांनी पोस्टानेही कार्ड पाठवले

तासनतास रांगेत उभे राहण्याची कटकट यापासून अभ्यागतांना दिलासा मिळावा, मंत्रालयात प्रवेश सहज मिळावा यासाठी डीजी प्रवेश ॲपची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.
मंत्रालयात प्रवेशाचे लंपास केलेले कार्ड परत करण्यास सुरुवात; दूरवरच्या अभ्यागतांनी पोस्टानेही कार्ड पाठवले
Published on

मुंबई : तासनतास रांगेत उभे राहण्याची कटकट यापासून अभ्यागतांना दिलासा मिळावा, मंत्रालयात प्रवेश सहज मिळावा यासाठी डीजी प्रवेश ॲपची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी झालेल्यांना डीजी ॲप प्रवेश कार्ड (आरएफआयडी) देण्यात येते. यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने तब्बल ८ हजार कार्ड बनवले. अभ्यागतांना दिलेले कार्ड बॉक्समध्ये जमा करणे बंधनकारक आहे. मात्र ८ हजार कार्ड पैकी ३,५०० कार्ड अभ्यासगतांनी लंपास केले होते. मात्र आता अभ्यागतांनी हे कार्ड परत करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे दूरवरच्या अभ्यागतांनी तर थेट पोस्टाने कार्ड परत पाठविले.

कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश ॲप प्रणाली अंमलात आणली आहे. या दोन्ही प्रणालीमुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असून फेस डिटेक्शनचे हजारो युजर्स आहेत. तर डीजी प्रवेश ॲपवर मोठ्या संख्येने नोंदणी होते. डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी करत दररोज दोन ते तीन हजार अभ्यागत मंत्रालयात येत असतात. डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी केलेल्या अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश करताना कार्ड देण्यात येते. जाताना गेटवर ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये जमा करणे बंधनकारक आहे. मात्र सूचना करूनही दुर्लक्ष केले तर त्या अभ्यागतांना पुन्हा मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार नाही. त्यामुळे अभ्यागतांनी कार्ड जमा करावे, असे आवाहन केल्याचे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in