Monsoon Session : पावसाळी चर्चा वादळी ठरणार; शुक्रवारी विशेष सभागृहाचे आयोजन

मुंबईत आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे ११ जणांचा मृत्यू तर २२ जण जखमी झाले आहेत. झाडे व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या असून या पार्श्वभूमीवर चर्चा, उपाययोजना सूचवणे यासाठी १० जुलै शुक्रवारी विशेष सभागृहाचे आयोजन केले आहे.
पावसाळी चर्चा वादळी ठरणार; शुक्रवारी विशेष सभागृहाचे आयोजन
पावसाळी चर्चा वादळी ठरणार; शुक्रवारी विशेष सभागृहाचे आयोजन
Published on

मुंबई : मुंबईत आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे ११ जणांचा मृत्यू तर २२ जण जखमी झाले आहेत. झाडे व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या असून या पार्श्वभूमीवर चर्चा, उपाययोजना सूचवणे यासाठी १० जुलै शुक्रवारी विशेष सभागृहाचे आयोजन केले आहे. या विशेष सभागृहात पावसाळ्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

"मुंबईत पावसाचे आगमन होताच अत्यंत गंभीर आणि चिंताजनक दुर्घटना घडल्या आहेत. चेंबूर येथे महाकाय वृक्ष कोसळून शालेय विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला असून चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. तसेच २ जुलै रोजी साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये पावसाचे आगमन झाल्यापासून बऱ्याच ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत पावसाळ्यात अशा जीवघेण्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी पालिकेने युद्धपातळीवर सर्व आवश्यक व आपत्कालीन प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्परतेने अंमलात आणल्या पाहिजेत," असे पत्र मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांसह काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी, ठाकरे सेनेचे नगरसेवक रमाकांत रहाटे, श्रद्धा जाधव यांनी पालिका सचिवांना लिहिले आहे.

उघड्या मॅनहोलची तक्रार व्हॉट्सअॅपवर करा

मुंबई : मुंबई शहर व उपनगरात उघडे मॅनहोल, नादुरुस्त मॅनहोल तर आता थेट व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करता येणार आहे. मुंबई महापालिका दोन दिवसांत मॅनहोलच्या तक्रारीसाठी व्हॉट्सअॅप नंबर जारी करणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in