महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत विश्वविजेता प्रशांत,आकांक्षा उपांत्य फेरीत

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत विश्वविजेता प्रशांत,आकांक्षा उपांत्य फेरीत

मुंबईच्या प्रीती खेडेकरवर चुरशीच्या लढतीत १६-१७, १६-१२, २०-१० उपांत्य फेरी गाठली
Published on

विरारमधील जुने विवा कॉलेज ये‌थे सुरू असलेल्या कै. भास्कर वामन ठाकूर चषक ५६व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात मुंबईच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेने ठाण्याच्या झैद अहमदवर २५-३, १४-२५, १९-६ अशा अटीतटीच्या लढतीत मात करून आपले आव्हान कायम ठेवले. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या प्रीती खेडेकरवर चुरशीच्या लढतीत १६-१७, १६-१२, २०-१० उपांत्य फेरी गाठली.

पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल

महम्मद घुफ्रान (वि वि) संदीप देवरुखकर (मुंबई) २०-१०, २५-०. पंकज पवार (मुंबई) वि वि अभिषेक चव्हाण (रत्नागिरी) २५-७, २५-७. सिद्धांत वाडवलकर (मुंबई) वि वि महम्मद यासिन शेख (मुंबई उपनगर) ४-२४, १९-१७, २५-२३.

महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल इतर निकाल

काजल कुमारी (मुंबई) वि वि प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) १८-१७, ११-२४, १९-१५. ऐशा साजिद खान (मुंबई) वि वि अंजली सिरीपुरम (मुंबई) २२-६, २५-०. निलम घोडके (मुंबई) वि वि चैताली सुवारे (ठाणे) २५-०, २५-५.

वयस्कर पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल

फय्याज शेख (पुणे) वि वि मनू बारिया

(मुंबई) २५-०, २५-५. संजय अडसूळ

(मुंबई) वि वि शब्बीर खान (मुंबई उपनगर) २५-१०, ६-२५, २२-१९.

logo
marathi.freepressjournal.in