महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला कोट्यावधीचा नफा

अडचणीतील साखर कारखाने व सहकारी संस्थांकरिता बँकेच्या प्रशासनाने शिफारस केलेल्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेस एकमताने मंजूरी दिली
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला कोट्यावधीचा नफा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची १११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातील सहकार सभागृहात ३० जून रोजी पार पडली. यंदाच्या आर्थिक वर्षात बँकेने थकीत कर्जासाठी १०० टक्के तरतूद करुन मिळविलेल्या रु. ६०३ कोटी इतक्या भरीव नफ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिफारस केलेल्या १० टक्के लाभांशास सभेने एकमताने मान्यता दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ सभा ऑनलाईन पध्दतीने पार पडल्यानंतर सदर सभा ही प्रथमच प्रत्यक्ष पार पडल्यामुळे सभेला सभासदांची लक्षणीय उपस्थिती होती.

सभेच्या सुरुवातीस बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी आर्थिक वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा घेत वार्षिक अहवालामध्ये नमूद केलेल्या सर्वच गोष्टींचा ऊहापोह केला. तसेच विषय पत्रिकेवरील प्रत्येक विषयांवर सभासदांनी विचारलेल्या सर्व शंकाचे संपूर्ण निरसन केल्यानंतरच एकमताने सर्व विषय मंजूर करण्यात आले.

अडचणीतील साखर कारखाने व सहकारी संस्थांकरिता बँकेच्या प्रशासनाने शिफारस केलेल्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेस एकमताने मंजूरी दिली. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात बँकेची एकूण उलाढाल रु.४७,०२७ कोटी, ढोबळ नफा रु.१४०२ कोटी, निव्वळ नफा रु. ६०३ कोटी, स्वनिधी सुमारे रु. ६०४६ कोटी, निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण `शून्य' टक्के राखल्यामुळे बॅंकेला सलग ८ वेळा ऑडिट वर्ग `अ' प्राप्त झाल्यामुळे सभासदांनी बँकेच्या प्रशासनाचा अभिनंदन करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला, अशी माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी एका निवदेनात दिली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in