सायन रुग्णालयाचा कायापालट; महाराष्ट्र राज्य पर्यावरण प्राधिकरणाचा हिरवा कंदील

अद्यावत सुविधा, ऑपरेशन थिएटर, सीसीटीव्ही कॅमेरे; दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित
सायन रुग्णालयाचा कायापालट; महाराष्ट्र राज्य पर्यावरण प्राधिकरणाचा हिरवा कंदील

अद्यावत सभागृह, ऑपरेशन थिएटर, डॉक्टरांसाठी निवासी संकुल, प्ले ग्राउंड, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे अशा सोयीसुविधांसह मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाचा कायापालट होणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, आता पुढील दोन टप्प्यातील कामासाठी नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आघात मुल्यांकन प्राधिकरणाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या कामाला वेग येईल, असा विश्वास पालिकेचे वास्तूशास्त्रज्ञ दुर्गेश पालकर यांनी सांगितले.

दरम्यान, सायन रुग्णालयाचा कायापालट तीन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित दोन टप्प्याचे काम वेळे आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न असून संपूर्ण कामावर २ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई शहर व पूर्व उपनगराजवळील सायन रुग्णालयात हे महत्वपूर्ण रुग्णालय आहे. पनवेल, अलिबाग या ठिकाणी अपघात झाल्यानंतर रुग्णाला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले जाते. त्यामुळे सायन रुग्णालयात सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये वाढ करत खाजगी रुग्णालयाच्या तोडीस अशा प्रकारे सायन रुग्णालयाचा पुनर्विकास केला जात आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सायन रुग्णालयासह अन्य रुग्णालयांचा पुनर्विकास व अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे पालकर यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण झाले विद्यार्थ्यांसाठी अंडर ग्रज्युएट हॉस्टेल इमारती १,२०० विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केली आहे. तर उर्वरित दोन टप्प्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. पुढील दोन वर्षांच्या आत अद्यावत सोयीसुविधांसह सायन रुग्णालय रुग्ण सेवेत असेल; मात्र आता काम सुरू असली, तरी रुग्णांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात आहे, असेही पालकर यांनी स्पष्ट केले.

'असे' होतेय काम

पहिला टप्पा

नसिॅग काॅलेज तळ अधिक + २०

बॅरेक प्लाॅटवर दोन निवासी टाॅवर

तळ अधिक २० मजली व तळ अधिक २४ मजली

दुसरा टप्पा

रुग्णालय इमारत

तळ अधिक ११ मजली

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in