देशातील पहिला ‘उन्नत पॉडकार’ मीरा-भाईंदरमध्ये; वाहतूक यंत्रणेत समावेश होणार

मुंबई : ‘उन्नत पॉडकार’ वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये चालविण्याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मकता दाखवली आहे.
देशातील पहिला ‘उन्नत पॉडकार’ मीरा-भाईंदरमध्ये; वाहतूक यंत्रणेत समावेश होणार
देशातील पहिला ‘उन्नत पॉडकार’ मीरा-भाईंदरमध्ये; वाहतूक यंत्रणेत समावेश होणारFPJ
Published on

मुंबई : ‘उन्नत पॉडकार’ वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये चालविण्याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मकता दाखवली आहे. त्यानुसार भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा-भाईंदर येथील ‘उन्नत पॉडकार’ वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेतल्यावर ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत वडोदरा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये ‘स्वयंचलित पॉडकार उन्नत प्रणाली’ प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था पाहाणी करण्यासाठी तसेच अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातील लोकसंख्येची दाट घनता असलेल्या शहरात वापर करण्याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली.

स्वयंचलित पॉडकार्स उन्नत ट्रॅक वर जोडल्या जातात. ज्या सध्याच्या रस्ते जाळ्यावर तैनात केल्या जातात. रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता त्या कार्यरत राहतात. एका पॉडकारमध्ये किमान २० प्रवासी बसू शकतात ६० ते ७० किमी प्रति तास या वेगाने या पॉ्ड कार प्रवास करतात. ऑन बोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी सिस्टम वर या कार्यरत राहतात. विशेष म्हणजे शहरी रस्त्यावरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात देखील त्या उपयुक्त ठरू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in