शालेय राष्ट्रीय गोळाफेक स्पर्धेत महाराष्ट्राच्या वैदेहीला सुवर्ण

शालेय राष्ट्रीय गोळाफेक स्पर्धेत महाराष्ट्राच्या वैदेहीला सुवर्ण

वैदेहीचे आई-वडील डॉक्टर असून शाळेतील शिक्षकांनी तिला यासाठी फार मदत केली आहे.

मुंबई : स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत ६७वी राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच लखनऊ येथे पार पाडली. यामध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक प्रकारात महाराष्ट्राच्या वैदेही सूद्रिकने सुवर्णपदक काबिज केले. वैदेहीने ११.४९ मीटर अंतरावर गोळाफेक केली. दिल्लीच्या उर्वशी यादवने ११.२८ मीटरसह रौप्य, तर केरळच्या अभिनयाने ११.२० मीटर अंतरासह कांस्यपदक पटकावले. वैदेहीचे आई-वडील डॉक्टर असून शाळेतील शिक्षकांनी तिला यासाठी फार मदत केली आहे. तसेच राष्ट्रीय ॲथलेटिक्स पदकविजेते रमण मिश्रा यांचे मार्गदर्शन वैदेहीला लाभते.

logo
marathi.freepressjournal.in